Youth Speak

संगीत आणि मी

सध्या पाश्चिमात्य संगीताचे वेड अख्ख्या जगाला लागले आहे. मी इंग्रजी गाणी ऐकत नाही, त्यामुळे काही लोक म्हणतात “अजीब है रे तू!”, आहेच मी आगळा-वेगळा. मला पाश्चिमात्य संगीतापेक्षा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूड जास्त भावतं.

नो ऑफेन्स, पण कधी कधी मला वाटतं *की,सोसायटीमध्ये राहणारी माणसं म्हणजे ती इंग्रजी गाणी ऐकत‌ असणारच असा बर्याच लोकांचा समज आहे. मी चुकीचा असेनही, कोणाची व्यक्तिगत मतं दुखविण्याचा माझा हेतू नाही. पण आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे की हिंदुस्थानी संगीत केवढं विशाल आहे ते?

Let me take you on a tour…

संगीत म्हणजे सुखद आवाज, संगीत म्हणजे मनाला शांतता देणारे स्वरबद्ध गीत. मला ते पाश्चिमात्य संगीतात जाणवत नाही. जे रस (emotions) शास्रीय संगीतातून लोकांपर्यंत पोहोचतात ते बाकी कोणत्याही संगीत क्षेत्रात मला जाणवत नाही.

तुम्हाला गाण्यातील भाव तेव्हाच कळतात जेव्हा तुम्हाला गीताचे शब्द कळतात, आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्हाला ती भाषा नीट येते. जसे, माझी मातृभाषा मराठी आहे आणि राष्ट्रीय भाषा हिंदी , अर्थात मला त्या दोन्ही भाषा नीट येतात म्हणून मला हिंदी आणि मराठी गीतांचे भाव कळतात आणि भावतातही.

शास्त्रीय संगीत १२व्या शतकापासून प्रचलित आहे , अशी इतिहासात नोंद आहे. परंतु पाश्चिमात्य संगीत हे १७व्या शतकापासून रुजू झाले. तरीही आपण हिंदुस्थानी संगीत सोडून पाश्चिमात्य संगीताकडे वळणं मला भावत नाही.

हिंदुस्थानी संगीताचे महान गायक, जसे तानसेन, भीमसेन जोशी यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. 90’s चा गोल्डन एरा/ सुवर्णकाळ गाजविणारे गायक किशोर कुमार, मंगेशकर घराणं, रफी साहेब यांची जवळपास सर्व गाणी अजरामर आहेत. आताचे गायक अरिजित सिंग, पॅपॉन हे आता प्रसिद्धी मिळवत आहेत. फक्त गायक नाही तर संगीत संयोजक आणि गीतकार यांना सुद्धा आठवणीत ठेवले पाहिजे/ यांचेही योगदान उल्लेखनीय आहे. मंगेश पाडगावकर, ए.आर. रहमान, गुरू ठाकूर, कुसुमाग्रज ह्यांनी रचलेल्या कविता आणि चाली आज आणि यापुढेही सर्वांच्या कायम लक्षात राहतील.

आताच एक viral झालेला व्हिडिओ असा होता की फुटबॉलला प्रतिसाद मिळावा यासाठी सुनील छेत्री ह्यांना social media वर चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन मॅच बघण्यासाठी आवाहन करावे लागले, त्यानंतर त्यांना भरपूर प्रतिसादही मिळाला, पण आपण असेच पाश्चिमात्य संगीताकडे वळत राहिलो तर अशी आवाहन करण्याची वेळ हिंदुस्थानी संगीतावरही येऊ शकते. पाश्चिमात्य गाणी ऐकण्याविषयी माझी हरकत नाही, परंतु हिंदुस्थानी संगीताकडे दुर्लक्ष होता कामा नये, एवढीच इच्छा.

-केदार फणसळकर​

DISCLAIMER: Views expressed above are the author’s own.