Youth Speak

The Manali Escape

एखादी ट्रेक किंवा रोडट्रिप म्हटली की लोकांची कल्पना त्यांना धमाल, मजा – मस्ती, थोडे adventure आणि सुखद – सुरळीत प्रवास ह्या कडे घेऊन जाते. परंतु कधी कधी हेच ट्रेक, थरारक प्रसंग आपल्या समोर उभे करतात. अगदी Thrilling Adventures. अर्थातच ह्याची कल्पनाही कोणाला नसते. पण ह्याच थरारातून स्वतःच्या धैर्याने जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा स्वतः बद्दल आणि आपल्या सोबतींबद्दल बद्दल वाटणारा हेवा हा आत्मविश्वास वाढवणारा आणि निश्चितच Tour Journey मध्ये एक Twist आणणारा असतो.

जानेवारी 2017 मध्ये आम्ही कॉलेज मित्रमंडळी मनाली ट्रेक ला जाऊन आलो. कुल्लू-मनाली- ‘The heavens on the earth’ असं म्हटलं तरी त्यात काही वावगं ठरणार नाही. मनालीला लागलेली ही विशेषणं जरी चांगली असली तरी हा प्रसंग तसा Thrilling च.

अगदी 2 दिवस मनाली मध्ये मजा मस्ती करून रात्रीच्या वेळेत आम्ही धरमशालाला प्रस्थान करत होतो. सकाळ पासूनच Heavy Snowfall चालू होता. रस्ते सुद्धा निसरडे झाले होते. इतक्यात आमच्या बसचं एक चाक दरीच्या कडेला अडकून पडलं. अचानक बस एकबाजूला कलंडताच मनात धडती भरली. सगळी कडे एकच शांतता. आजूबाजूला बरीच मंडळी जमा झाली. बसचं दारही दरीच्या बाजूला असल्याने बाहेरही पडता येत नव्हतं. बस मध्ये बसल्या बसल्या वेगळ्याच विचारांना वावटळं फुटू लागली. बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. रस्ता खूपच निसरडा असल्याने काम खूपच अवघड झालं होतं. बरेच प्रयत्न झाले. अखेरीस जमवाच्या आणि दुसऱ्या बसच्या मदतीने बसला पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्यात यश आलं. ह्या यशावर काय React करावं हेच समजत नव्हतं. पुन्हा बसचा प्रवास सुरु झाला. दिवसभराच्या मजा मस्तीने फारच थकवा आला होता. बसचे Lights Off झाले आणि गाणी ऐकता ऐकता कधी झोप लागली कळलेच नाही.

पहाटे जाग आली ती मित्रांच्या टिंगल-टवळीनेच. बाहेर पाहिलं तर सगळी कडे फक्त बर्फच बर्फ. कानावर उडती खबर आली की पुढे एका बसचा accident झाल्याने ट्रॅफिक जाम आहे. बरेच जण बसमधून उतरून snowfall ची मजा घेत होते, काही ठिकाणी पत्त्यांच्या डाव रंगला होता तर काही ठिकाणी photography. एव्हाना कडकडून भूकही लागली होती आणि आसपासच्या अंतरावर एकही हॉटेल नसल्याने आम्ही पुन्हा एखाद मैल मागे एका हॉटेल पर्यंत चालत गेलो. नाश्ता करता करता काल रात्रीच्या प्रसंगाने गप्पांना एक वेगळच उधाण फुटलं होतं. Traffic सुटायला बराच अवधी लागणार असल्याने आमच्या हेड्स कडून आम्हाला पायीच तो घाट उतरण्याचे सांगण्यात आले. दुपारचं जेवणही तिथेच आटोपलं आणि मनाची तयारी करून आम्ही निघण्याच्या तयारीस लागलो.
संपुर्ण शरीर झाकलेलं, हातात Gloves, पायात बूट , आणि चेहऱ्यावर रुमाल किंवा मफलर असा काहीसा पेहराव करून आम्ही निघालो.

सुरुवातीला चालणं थोडं अवघड वाटत होतं. बरेच जण चालताना पडत असल्याने हातांची साखळी करून एकमेकांना सावरत आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात चालण्याची सवय झाल्यावर पुन्हा टिंगल-टवाळीला सुरुवात झाली. बराच वेळ चालून झाल्यावर मस्त गप्पा-टप्पा चालू असतानाच एका टपरी जवळ आम्ही चहा-पाण्यासाठी थांबलो. Chai आणि Beautiful Manali हे Combination खरच खूप awesome होतं. बाजूलाच शेकोटीचाही कार्यक्रम चालू होता. आम्ही सुद्धा त्यांना जाऊन join झालो. इतक्या थंडी मध्ये असे क्षण अनुभवणं ह्या बाबतीत तरी आम्ही खूपच lucky होतो.

त्या विसाव्या नंतर आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. एव्हाना थंडीचा जोरही आपसूकच वाढू लागला होता. काहींच्या पायात cramp सुद्धा आले. तरी एकमेकांना सावरत आम्ही पुढे चालत होतो. थंडी वाढत असल्याने हातावर हात चोळणे, तेच चेहऱ्यावर लावणे, मध्ये मध्ये धावणे असे शरीराला उब देण्याचे सर्व प्रयत्न चालू होते. इतक्यात कोणीतरी 2-3 बिडी आणि रम ची बाटली आणली आणि सर्वांचीच उत्तम सोय झाली. मन नसलं तरी Try करण्यात काय हरकत आहे अशी समजूत घालून पहिल्यांदाच 4-5 जणांमध्ये 1 बिडी ओढण्याचा प्रयोगही झाला.

थोडं पुढे चालत गेल्यावर तिथली एक लोकल बस आम्हाला दिसली. त्यांना विनंती केल्यावर त्यांनीही थोडं पुढं पर्यंत सोडण्याची तयारी दर्शवली. त्या एका छोट्या बसमध्ये तब्बल 30-35 जण गर्दी करून जसा जमेल तसं Adjust करून पुढे निघालो. त्याच बसने आम्हाला आतल्या रस्त्याने जमेल तितक्या पुढे आणून सोडलं. आमचा 2-3 Km चा रस्ता सुखकर झाला.

बसमधून उतरताच आमच्या हेड्स कडून समजले की आपली बस ही घाट उतरून आली असून 1-2 किलोमीटर च्या अंतरावर उभी आहे. ह्याच काय त्या उत्साहात सर्वजण पुन्हा चालायला लागले. संध्याकाळचे 5.30-6 झाल्याने अंधार ही पडायला सुरुवात झाली होती. थंडी सुद्धा असह्य होत होती. अखेरीस ! आम्ही बसपर्यंत पोहचलो. तेव्हाचं मनालीचं ते अद्भुत दृश्य आजही Heaven मध्ये असल्याचा Feel देतं. Finally ! ! ! ह्या Thrilling Journey ला Good Bye करून आम्ही बसमध्ये बसलो. थकवा फारसा नसला तरी बऱ्याच जणांचे हात-पाय आखडून गेले होते. पायाचे तळवे अगदी पांढरेफट्ट झाले होते. बसमध्येही रम ची सोय असल्याने बऱ्याच जणांनी ती हात-पायांना लावली. काहींनी घेतली सुद्धा.

5 तासांचा हा पायीप्रवास जरी रोमांचक असला तरी हा बर्फाळ घाट सरून आल्याचा आंनद जास्त होता.

– Vaibhav Dudhane

DISCLAIMER: Views expressed above are the author’s own.