Youth Speak

A month in मद्रास

Hello friends, 🙏वणक्कम्…..🙏,

 

जे कोणी हे सकाळी वाचतील त्यांना “कालई वणक्कम्”, दुपारी वाचणा-यांना “मध्याणम् वणक्कम्”, संध्याकाळी वाचणा-यांना “मालई वणक्कम्” आणि रात्री वाचण-यांना “इराउ वणक्कम्”. (I hope तुम्हाला bold type मधल्या या शब्दांचे अर्थ एव्हाना कळले असतील.)

 

तर तमिळमध्ये सुरुवात करण्याचं कारण…. “How is Chennai?”, अशा अर्थाचे messages आणि phone calls. मागच्या महिन्याभरापासून हे सर्व चालू आहे, पण “इथे मुंबईसारखा धो धो काय तर तुरळक सरी देखील पाऊस नाही. फक्त कडकडीत ऊन.” आणि फार फार तर company आणि hostel (PG), याव्यतिरिक्त आणखी काही सांगण्यासारखं काही नव्हतं. आज बरोब्बर १ महिन्याने शनिवार-रविवारची (२१-२२ जुलै) जोडून सुट्टी मिळाली, म्हणून मद्रास दर्शनाला निघालो. तर, मी या दोन दिवसात इथे जे जे बघितलं, ते तुम्हालाही शब्दरूपाने दाखवण्याचा प्रयत्न करतो. So i hope की, तुम्हाला आवडेल.

 

मद्रास ज्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे म्हणजे बीच. चेन्नई शहर आणि त्याच्या उपनगरांपासून जवळ असे अनेक बीच आहेत. मरीना बीच, बेसंत नगर (Elliot) बीच, तिरुवणमियूर बीच, तिरुवल्लुवर बीच, कोट्टीवक्कम बीच, पल्लवक्कम बीच, नीलनकाराई बीच वगैरे वगैरे वगैरे…. ही यादी न संपणारी आहे. मी पहाटे ४.३० ला निघालो ते मरीना बीचवर जाण्यासाठी. इतक्या लवकर जाण्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे सूर्योदय. आपल्याकडे (मुंबईत) समुद्रकिनारी संध्याकाळी सूर्यास्त बघायला माणसं जातात. पण इथे समुद्रातून सूर्योदय दिसतो. इथे आल्यादिवसापासून मला तो बघायचा होता. आणि दुसरं कारण म्हणजे हा बीच सिटीपासून सर्वात जवळ आहे, आपल्या Gate way of India सारखं. मी जिथे राहतो तो area, Karapakkam, चेन्नई सिटीपासून २२ किमी लांब आहे. म्हणून मी पहाटे निघायचं ठरवलं. Room mate ला विचारलं येणार का? पण तो नाही म्हणाला म्हणून मग एकटाच निघालो.

 

५.३० ला मी मरीना बीचवर पोहोचलो. अंधार होता आणि आसपास कुणीच नव्हतं. एक घोडा फक्त उभ्या उभ्या झोपला होता. (तो झोपला होता याची मी जवळ जाऊन खात्री केली आहे). रस्ता समुद्रापासून खूप लांब आहे, तेव्हा पाण्यापर्यंत पोहोचायला ५ मिनिटं वाळूतून चालावं लागतं. चालताना हळूहळू  आणखी माणसं दिसायला लागली आणि लक्षात आलं की एवढ्या लवकर इथे येणारा मी एकटाच नव्हतो. माझ्याही आधी इथे अनेक लोक आलेले होते. मग मी सूर्योदयाची वाट बघत बसलो. थोड्या वेळाने शेजारी बसलेला एक अण्णा बोलला, “NO SUNRISE TODAY (😱😱). CLOUDS ONLY.” (Better luck next time). मग साडेसहा वाजेपर्यंत तिथेच भटकलो. भूक लागायला लागली म्हणून परत निघालो. त्यावेळेपर्यंत फक्त इडली-वड्याचा १ स्टाँल उघडला होता आणि एक ice cream parlor. रोजच्या नाशत्यातून बदल म्हणून Ice cream घेतलं खायला.

 

त्याच किना-यावर जयललीता ( कार्यकाल १९९१ – २०१६), M. G. Ramachandran (M.G.R.) (कार्य. १९७७ – १९८७) आणि N. C. Annadurai (Anna) (कार्य. १९६७ – १९६९) या तामिळनाडूच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या समाधी आहेत. एखादं मंदिर किंवा आश्रम वाटावा एवढ्या त्या जागा स्वच्छ, शांत आणि हिरव्यागार आहेत. आपल्याला जर आपल्या एखाद्या नेत्याचं स्मारक तयार करायचं असेल तर ते असंच असावं.

M.G.R. Memorial

Jaylalita is buried here

Anna Memorial

 

तिथे असलेलं एक वस्तुसंग्रहालय, सकाळी लवकर गेल्याने मी पाहू शकलो नाही. याच्या प्रवेशदारासमोरच मद्रास विद्यापीठाची इमारत आहे. त्याशेजारच्या footpath वरून चालतं गेलं की पुढच्या चौकात चेपाँक मधलं ‘चिदंबरम क्रिकेट स्टेडियम’ आहे. (IPL सारखं TNPL, तमिळनाडू Premier League सध्या इथे जोरदार चालू आहे.) त्याला खेटून चेप्पाकम नावाचं उपनगरी गाड्यांचं स्टेशन आहे. तिथे गाडी पकडून मी ‘तिरुमैलै (मैलैपुरम)’ ला गेलो.

 

मैलैपुरम्

 

मुख्य शहराच्या दक्षिणेला वसलेलं हे एक उपनगर. चेन्नई शहराचं सांस्कृतिक केंद्र अशी मैलैपुरम् ची ओळख आहे. हे ठिकाण मुख्यतः प्रसिद्ध आहे ते म्हणजे कपालीश्वर मंदिर, कचेरी उत्सव आणि रामकृष्ण मठ यासाठी.

 

यामधील सर्वात प्रसिद्ध म्हणजे कपालीश्वर मंदिर. असं सांगितलं जातं, की या ठिकाणी बसून पार्वतीने (शक्तीने) शिव म्हणजे शंकराची उपासना केली आणि भगवान शंकरांनी तिला मोराच्या रूपात दर्शन दिलं. तमिळ भाषेत मोराला ‘मैलै’ म्हणतात, म्हणून हा भाग मैलैपुरम् नावाने ओळखला जातो. हे मंदिर ७ व्या शतकात बांधलेलं असून त्याची रचना द्राविडी पद्धतीची आहे. चेन्नई शहरातील सर्वात जुनी लोकवस्ती म्हणजेही मैलापूरच.

Kapaleeshwar mandir

 

कचेरी उत्सव ही कर्नाटकी शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी पर्वणी आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हे संमेलन असतं आणि अनेक दिग्गज गायक या मैफिलीसाठी येतात. (ही माहिती मला एका मित्राने सांगितली आहे.)

 

देवपूजा झाली, आता पोटपूजेबद्दल.

 

दक्षिण भारत म्हणजे इडली-डोसा-भात हे खरं असलं तरी पूर्ण सत्य नाही. गणिताच्या भाषेत सांगायचं तर हे super set आहेत. इडलीचे ३-४, डोशाचे ८-१०, वड्याचे ४-५, भाताचे असंख्य प्रकार इथे मिळतात. सर्वणा भुवन, आनंदाज भुवन, हाँटेल संगीता या प्रसिद्ध chains आहेत. इतरही अनेक स्वस्त आणि मस्त ठिकाणं आहेत. आणखी एक नाव आवर्जून घ्यायचं ते म्हणजे Mami Tiffin Stall. याचं एकमेव हाँटेल मैलैपुरम् मध्ये आहे. (या सगळ्याची मजा घ्यायची असेल तर रोज भात खाण्यासाठीची capacity आणि न झोपता तो पचवण्याचा stamina हे दोन्ही वाढवा.😅)

 

SHOPPING

 

चेन्नईमधलं local market म्हणजे त्यागराय नगर (टी नगर). हे आपल्या दादर सारखं आहे. (या एका ओळीवरून सगळी कल्पना आली असेल.)

रेशमी कपड्यासाठी प्रसिद्ध शहर कांचीपुरम् (कांजीवरम्) चेन्नई पासून २ तासावर आहे. मोठी खरेदी तिथे जाऊन एका दिवसात करता येते. किंवा तिथल्या व्यापा-यांनी आपल्या शाखा टी नगर मध्ये उघडल्या आहेत. S. M. Silk, Nalli Silk, Pothy’s boutique हे रेशमाचे काही प्रसिद्ध अग्रगण्य व्यापारी आहेत.

मैलैपुरम् मध्ये Luz corner (लझ काँर्नर) नावाचा एक मार्केट एरिया आहे. तिथे जरा लवकर खिसे हलके होतील.

 

चेन्नई आणि मराठी माणूस

 

चेन्नईत मराठी लोक २०० वर्षांपूर्वीपासून राहत आहेत. इग्मोर परीसरात महाराष्ट्र मंडळ आहे, जिथे महाराष्ट्रातील सण साजरे केले जातात. (२ आठवड्यापूर्वी मी तिथे आषाढीच्या कार्यक्रमासाठी जाऊन आलो.) आता गणेश उत्सव साजरा होईल. Tourist म्हणून आलात राहण्याची सोय इथे होईल.

 

इथल्या एका रस्त्याला दुर्गाबाई देशमुख रोड असं नाव आहे. रानडे library नावाने एक ग्रंथालय आहे.

एकंदरीत काय, तर हे शहर आपल्याला आता अनोळखी राहिलेलं नाही आणि ‘मुंबईत राहणारा माणूस जगात कुठेही राहू शकतो’, हे आता मी स्वानुभवाने सांगू शकतो. थोडेफार रोजच्या वापरातले तमिळ शब्द शिकलात, की इथे राहणं अवघड नाही.

 

– Mr. Himanshu Dabke

 

DISCLAIMER: Views expressed above are the author’s own.